धुळे (प्रतिनिधी):-एप्रिल सध्या धुळे शहरात करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेल्या संचारबंदी मुळे धुळे शहरातील हजारो नागरिक उध्वस्त होण्याची वेळ येवून ठेपली आहे.व त्यामुळेच धुळे शहर अँन्टी करोना टास्क फोर्सच्या वतीने धुळे शहरातील मोलमजूरी करणाऱ्या कष्ट करणाऱ्यांसह समाजाची बाराही महीने तिन्ही त्रिकाळ अहोरात्र सेवा करणारे विविध सामाजिक संस्थांचे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना किराना सामानाचे सम्मान पुर्वक वाटप सुरू आहे.व दि.१५ एप्रिल रोजी देखील मिल परिसर गाळणकर नगर येथील गरजू वयोवृद्धा श्रीमती रत्नाबाई गुलाब मराठे यांना एक हजार रूपयांचा किराना सामान अँन्टी करोना टास्क फोर्सच्या वतीने व दानशुरांच्या मदतीतून सम्मान पुर्वक जिल्हा समन्वयक सौ.कविताताई कोळी यांच्या निर्देशावरून डॉ.श्रीकृष्ण बेडसे यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.याप्रसंगी अँन्टी करोना टास्क फोर्सचे पदाधिकारी श्री.पारसदादा देवपुरकर तसेच धनंजय गाळणकर उपस्थितीत होते.
अँटी कोरोना टास्क फोर्सच्या वतीने गरजू वृद्धेला मदतीचा हात
