कोल्हापूर(प्रतिनिधी संजय पाटील)महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी, ईगल फौंडेशनचे राज्य संपर्क प्रमुख सुभाष भोसले सर यांची ” महाराष्ट्र माझा ” च्या वेब चॅनलवर पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ आणि देशपातळीवर अँटी कोरोना टास्क फोर्स या संस्थेवर पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख म्हणून निवड झाली आहे. प्रा. तुकाराम पाटील यांची महाराष्ट्र माझा वर पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ व अँटी कोरोना टास्क फोर्स कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली आहे व संजय पाटील यांची “महाराष्ट्र माझा”च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी व अँटी कोरोना टास्क फोर्स शाहूवाडी तालुका समन्वयक म्हणून निवड झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार कांबळे ,सांगली, तसेच प्रा.डॉ.स्मिता गिरी यांची “महाराष्ट्र माझा”या वेब चॅनेलवर कोल्हापूर शहर प्रतिनिधी व अँटी कोरोना टास्क फोर्सच्या कोल्हापूर शहर महिला समन्वयक पदी निवड ,चारुदत्त रणदिवे यांची कोल्हापूर शहर समन्वयक पदी निवड,तसेच संदीप बोटे यांची अँटी कोरोना टास्क फोर्सच्या कोल्हापूर जिल्हा सल्लागारपदी निवड केली आहे.या सर्वांचे शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य कडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तसेच यापूर्वी यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत.
इलेक्ट्रॉनिक मिडिया मधून यांची पत्रकारीता ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली आहे. यांच्या लेखनाला संवेदनशीलतेची झालर असते.. अन्यायाला वाचा फोडताना सकारात्मक प्रहार असतो..
महाराष्ट्र माझा ही वाहीनी राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेली विश्वासार्ह वृत्त वहिनी आहे.. देश पातळीवर अँटी कोरोना टास्क फोर्स ही संस्था शासकीय यंत्रणेबरोबर कोरोना आपत्तीमध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण, मास्क, वैद्यकीय सेवा,सॅनिटायझर व नॅपकीन पुरविते. हे काम अधिक प्रभावी व फलदायी स्वरुपात होण्यासाठी अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र व गोवा अध्यक्षा भारती चव्हाण यांनी सर्वांच्या निवडी केल्या आहेत.
हे सर्व सन्माननीय विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत.. ग्रामीण विकासावर यांचा चौफेर अभ्यास आहे. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, शिक्षक व शिक्षकेतर बांधव, शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्या चांगल्या कामाची नोंद घेणे, शासकीय यंत्रणेतील दोष दाखवून सुधारण्याची सूचना करणे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्य याबाबत शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांना सहकार्य करुन प्रबोधन करणे ही कामे अत्यंत प्रामाणिकपणे हे पत्रकार करीत असतात.
आॅगष्ट २०१९ मधील महापूर आणि सध्याच्या कोरोना आपत्तीमध्ये सुभाषजी, तुकारामजी आणि संजयजी यांनी ज्या बातम्या दिल्या, वृत्तांकन केले त्यामुळे जनता आणि शासन यांना आपत्ती व्यवस्थापन कामात उत्कृष्ठ मदत होत आहे.
कोरोना आपत्तीमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कर्मचारी, भाजीपाला, किराणा व दूध विक्रेते,शेतकरी, सैनिक हातावर पोट असणाऱे कष्टकरी यांना कोरोना आपत्तीमध्ये वितरित होणारी मदत, शेतकरी वर्गाचे योगदान इ. विषयावर यांनी दिलेल्या कव्हरेज मुळे आपत्ती व्यवस्थापन कामास भरीव हातभार लागत आहे. शाळा, महाविद्यालये सुट्ट्या, बोर्ड, विद्यापीठ परीक्षा याबाबत सतत यांनी अपडेटस दिल्याने जनतेला खूप मोठी मदत झाली आहे. या मंडळींच्या वृत्तांकनात बातम्यांचे शिर्षक हे लक्षवेधी असतात.. भाषा सुबोध असते व मांडणी मुद्देसूद असते. या सर्वांची पत्रकारिता ही मानवी मूल्यांचे संवर्धन करणारी आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा, कृषी, शिक्षण, थोर-मोठ्यांच्या जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव, गुणवंतांची कामगिरी, महिला उन्नती, जेष्ठ नागरिक सन्मान वैचारीक प्रबोधन या सर्व बाबींचे कव्हरेज यांच्या संवेदनशील लेखणीत प्रकर्षाने आढळून येते. महाराष्ट्र माझा आहे, त्याच्या भल्यासाठी आम्ही आहोत या पवित्र भावनेने बहुजन समाज शिक्षण व कल्याणाचे काम करणार्‍या या सर्वांच्या निवडी करुन महाराष्ट्र माझा व अँटी कोरोना टास्क फोर्सने रचनात्मक काम केले आहे त्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करतो.
पुरोगामी महाराष्ट्र व धर्मनिरपेक्ष भारत बळकट करणाऱ्या छ. शाहू महाराजांच्या पराक्रमी मातीतील या तिघांच्या हातून छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा सन्मान सतत होत राहो अशी शुभेच्छा देतो.अशी प्रतिक्रिया प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे,उपाध्यक्ष,
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य
यांनी दिली आहे.