शिराळा (प्रतिनिधी मनोहर कांबळे)कोरोना निगेटिव्ह आलेल्या त्या कुटूंबातील १४जणांना मंगळवारी क्वारंटाइन सेंटर मधून घरी सोडण्यात आले.गांधी चौकामध्ये त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. शहरात करोनो ने धुमाकूळ घातला असता २५ जण कोरोना बाधित होते .पालिका प्रशासन ,पोलीस प्रशासन,आरोग्य प्रशासन यांनी गांधी चौक लॉक डाउन केला होता.त्या कुटूंबाच्या १४जणांना क्वारन्टाइन केले होते.त्याचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती .गेल्या २० दिवसापासून त्यांना क्वांरंटाईंन केले होते.त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे.१४ जण घरी येण्यापूर्वी पालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार ,उपमुख्याधिकारी प्रमिला माने,त्यांच्या उपस्थितीत नगरसेवक अमित ओसवाल पालिकेचे साहेबराव जाधव ,दिलीप कुंभार यांनी त्या संबधित कुटूंबियांच्या घरावर औषध फवारणी करून सर्व परिसर स्वछ केला.नंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले.बऱ्याच दिवसांनी घरी आल्याने घरच्या लोकांच्या भावना अनावर झाल्या.
इस्लामपूरकारांना मिळाला दिलासा ते १४ जण घरी परतले
