कोल्हापूर (प्रतिनिधी गोरख कांबळे)प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय वस्तीग्रह covid-19 केअर सेंटर आणि covid-19 हेल्थ सेंटर तयार आहेत.त्यातील सुविधा अद्ययावत करा. अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल,निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे,जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण शिरसागर,जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे,व भूसंपादन अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई म्हणाले की, दिल्लीवरून आलेल्यांपैकी काही व्यक्ती चुकून राहिल्या असतील तर त्याना शोधून काढा व सर्वांची सक्तीने तपासणी करा त्याच बरोबर त्यांचा स्वँब घेतला आहे का? याचीही खात्री करा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी ही झाली पाहिजे, याची दक्षता घ्या.अजूनही काही ठिकाणी बाहेरून लोक येत आहेत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा लोकांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा. संस्थात्मक अलगीकरण केंद्र निवारा शिबिरे याठिकाणी शासनामार्फत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत.तसेच साखर कारखाना स्तरावरील कामगार शिबिरांमध्ये कारखान्यानी सुविधा करावयाच्या आहेत .अशा ठिकाणी भेटी दया. त्याठिकाणी सुविधा पुरविल्या जातात की नाही? हे वैयक्तिक रीत्या तपासून अहवाल सादर करा.
ग्रामस्तरावरील बाहेरून आलेल्या ज्या लोकांनी माहिती अद्याप अपूर्ण दिली आहे ती ग्राम समितीच्या संपर्क अधिकार्‍याकडून तात्काळ भरून घ्या. मुख्याधिकार्‍यांनीही प्रभाग समितीच्या संपर्क अधिकार्‍याची माहिती द्यावी. असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या इतिहासाची बारकाव्याने नोंद घ्या.व तो कुठे कसा गेला व आला तसेच कोणाला भेटला,याची इतंभूत माहिती माहिती घ्या व तसा अहवाल सादर करा.अश्या सक्त सूचना संबंधित खात्यातील अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.