देऊळगाव मही:- घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे.
आज कोरोना सारख्या महामारीत
राज्यात आणि देशात कोरोना व्हायरस ने जो थैमान घातलेला आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री यांनी राज्यात मुबलक रक्तसाठा नसल्याचं सांगून रक्तदानाचे आव्हान केले होते त्यांच्या आवाहनाला साथ देत आज देऊळगाव मही येथे उपक्रम राबवण्यात आले.
न्याय आणि समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला, त्यांच मूल्यांपासून प्रेरणा घेत त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करत देऊळगाव मही बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यांनिमीत्त एकूण ५१ युवकांनी देशा साठी रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
यानिमित्त प्रा.कमलेश खिल्लारे मा.सरपंच प्रदीप हिवाळे,अभिनेते महेंद्र खिल्लारे,ब.वंचीत आघाडी तालुका धर्मराज खिल्लारे,आकाश खिल्लारे,
नितीन खिल्लारे,नितीन शिंगणे,पिंटू पाबळे,अशांत गवई,अमोल खिल्लारे,गौतम झिने,मनीष अंभोरे,धनंजय साळवे,आकाश इंगळे
गौरव बोथरा,गजानन साळवे
रवी सोळणके,अशोक खिल्लारे
प्रमोद खिल्लारे,विवेक खिल्लारे
दीपक शिंगणे,दिनेश राजपूत
गणेश सोसे,अमोल इंगळे,संदीप खिल्लारे,लिंबाजी खिल्लारे व इतर मान्यवर उवस्तीत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देऊळगाव मही येथे रक्तदान शिबिर
