कोल्हापूर( प्रतिनिधी गोरख कांबळे):-भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी घरोघरी अतिशय शांततेच्या मार्गाने साजरी करण्यात आली देशावर व राज्यावर कोरोनचे संकट असल्याने या परिस्थितीमध्ये कोणतीही व्यक्ती घराबाहेर न पडता सार्वजनिक सण-उत्सव घरामध्ये साजरे केले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी व घरातील दरवाजा समोर रांगोळी काढून सर्व भीम बांधवांना मोठ्या उत्साहात सार्वजनिक ठिकाणी जाऊन गर्दी न करता प्रत्येकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरामध्ये राहूनच त्यांच्या विचारांचा वारसा जपला.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व फोटोला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी घरांमध्ये असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीना त्यांच्या जीवनावरील काही प्रसंग सांगून तसेच त्यांच्या जीवनावर आधारित एखादे पुस्तक वाचन करून किंवा त्यांच्या विचारांचा संकल्प करून व घरातमध्ये गोड पदार्थ तयार करून अतिशय शांततेच्या मार्गाने शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व या नियमांचे उल्लंघन न करता सर्वांनी घरामध्येच राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.