कोल्हापूर(प्रतिनिधी संजय पाटील):-वादळी वारा व गारपिटीचा पाऊस झाला.या वादळी वाऱ्यामुळे शाहूवाडी तालुक्यात मोठमोठी झाले मुळासकट उन्मळून पडली. रस्त्यावर व विजेच्या खांबावर पडून विजेच्या तारावार पडल्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या.त्यामुळे शेतीसाठी विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला;त्यामुळे शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत वहिनी तुटून पडल्यामुळे शेतीची कामे खोळंबली.
वादळी वारा व गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका,गहू,हरबरा,कोबी ,फ्लॉवर,टोमॅटो,दोडका,कलिंगड व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अगोदरच कोरोनाचा फटका शेतीला बसला आहे ;त्यातच या अवकाळी पावसाने शेतीला मोठाच फटका बसला आहे.
