कोल्हापूर~सुभाष भोसले
कु.हर्षद अनिल चव्हाण याने आकर्षक चित्रा बरोबरच कागदी वस्तूही बनविल्या. वसंतराव देशमुख हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारा कु. हर्षद अनिल चव्हाण (रा. लक्ष्मीटेक कॉलनी ,सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर )याने सुट्टीच्या काळात विविध प्रकारच्या कागदी वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये पुठ्याची तलवार, छत्री, मॅजिक फुल, ढाल गिफ्ट पॉकेट इत्यादी वस्तू बरोबरच कार्टून चित्रेही त्याने पेन्सिलने स्केच केलेली आहेत .त्याच बरोबर पाण्यात संचार करणाऱ्या मगरीचे सुंदर चित्र स्केच करून हे आकर्षक रंगात रंगविले आहे .विविध प्रकारची फळे, घरगुती भांडी , मानवी चेहरे , घर, पक्षी अशा पद्धतीची अनेक चित्रे हर्षद ने स्केच करून आकर्षक रंगात रंगविले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हर्षदने घरातच सुट्टीतील छंद अशा पद्धतीने जोपासले आहेत.हर्षदच्या या अभिनव छंदाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.