पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चिफ-सुभाष भोसले
कोरोना आजारामुळे संपुर्ण देशाला वेठीस धरले आहे.त्यातच ज्या लोकांना व्यसने आहेत त्यांना त्याचा प्रादुर्भाव लवकर होतो असे डॉक्टर व संशोधकांनी सांगितले आहे .कारण व्यसनी लोकांची प्रतिकार क्षमता खुप कमी असते त्यामुळे त्यांना कोणताही आजार होवू शकतो.त्यामुळे या आजारातून वाचायचे असेल तर व्यसनमुक्त होऊन,प्रतिकार क्षमता वाढविणे गरजेचे आहे.यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९जयंतीला १२९ लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प आहे तरी आपल्या नातेवाईक,मित्रमंडळी या बाबत जागरुक करुन संपर्क करण्याचे आवाहन करत आहे .तरी प्रत्येक लोकांनी किमान एका व्यक्तिला व्यसनमुक्त करण्याचे कार्य गरजेचे आहे..याविषयी मला लवकरच खालील नंबरवर संपर्क करा.९८५०४५०४१४,७९७२८८३२३५असे आवाहन सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक उत्तम कांबळे यांनी केली आहे.