कागल~सुभाष भोसले
अनेक स्थलांतरील, हातावर पोट असणाऱ्या व रोजंदारीवर काम करीत असलेल्या नागरिकांची राहण्याची व भोजनाची सोय श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कागल येथे करण्यात आली आहे. त्यांना पोटभर जेवण मिळावे व कोणाचीही उपासमार होऊ नये हा माझा प्रयत्न आहे. त्यांना सकस आहार पुरवता यावे व त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी मी कार्यरत आहे. या नागरिकांना अन्नदान करताना त्यांच्या चेहर्‍यावर आलेले ते समाधान हीच माझ्या कार्याची पोचपावती आहे. आज माणुसकीच्या नात्याने आपण देखील गरजूंना शक्य ती मदत नक्की करा परंतु नियमांचे उल्लंघन होणार नाही याची देखील काळजी घ्या.अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केली.