चाळीसगाव(प्रतिनिधी)सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान चालु आहे. यात देशासह महाराष्ट्र देखील संकटात सापडलेल्या आहे,या संकटावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतांना संपूर्ण देश लाॅकडाऊन करावा लागला आहे,त्यांचा फटका महाराष्ट्रासह चाळीसगाव तालुक्यातील हातावर पोट भरणार्याणा मोठा फटका बसला आहे,त्यांचे खुपच हाल होताय,त्यांना यातुन सावरण्यासाठी तालुक्यातील सगळ्याचं संघटना रस्त्यावर आहेत तरी मदत कुठेतरी कमी पडतेय की काय यासाठी लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाण तर्फे आज पासून अन्नसेवा चालु करण्यात येत आहे त्यात जेवणाचे 900 पाकीट व 900 पाणी बाॅटल दररोज पुरविण्यात येणार आहेत
आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा वाजागाजा व फोटोशेशन न करता सर्व सामान्य माणसांपर्यंत मदत पोहोचवणं हाच प्रामाणिक प्रयत्न आहे, यासाठी विशेष सहकार्य मा.उमेश (पप्पुदादा) गुंजाळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख/बांधकाम सभापती अं.नगरपालिका.
