देऊळगाव मही(प्रतिनिधी आदील पठाण):-आज महाराष्ट्र भर कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आहे.
या पाश्वभूमीवर महाराष्ट्र रक्तसाठा कमी असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली होती,यांच्या आवाहनाला साद देत कोरोना महासंकटाच्या काळात महाराष्ट्र सरकार ला साथ देत जय भवानी गणेश मंडळ देऊळगाव मही यांच्या वतीने दत्त मंदिर परिसरात रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.यानिमित्त दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले,
यावेळी महिला ही मागे न राहता मदतीसाठी पुढे सरसावल्या व समाजहिताच्या भिमिकेतून महिलांनी ही रक्तदान केले.
यामध्ये सौ.शीतल नितीन शिंगणे, सौ.वैशाली संतोष जोशी यांनी रक्तदान केले.यावेळी जयभवानी गणेश मंडळ चे अध्यक्ष दत्तात्रय शिंगणे,उपाध्यक्ष किरण शेळके, सचिव संभाजी शिंगणे, सचिव नितीन जोशी, अनिल इंगळे, गजानन शिंगणे, अनिल नागरे,प्रशांत कर्हाळे, अतिष शिंगणे, आकाश शिंगणे, अजय वायाळ,संतोष जोशी, समाधान शिंगणे, जगन्नाथ वखारे,शिवाजी शिंगणे,राजेंद्र शिंगणे यांनी परिश्रम घेऊन एकूण ४२ रक्तदात्यांचे रक्तदान वरून घेतले.
यानिमित्त राष्ट्रवादी नेते जि. प बांधकाम सभापती रियाज पठाण, राष्ट्रवादी नेते भिकाजी शिंगणे,सरपंच पती अनंथा इंगळे, उपसरपंच रामा म्हस्के, कृ.उ.बा.मा.सभापती नितीन शिंगणे,राजेंद्रडुंगरवाल, स.पो.उ.अकिल काझी,अनिल शिंगणे,परिवर्तन फाउंडेशन अध्यक्ष समाधान शिंगणे,युवासेना उपजिल्हा प्रमुख संभाजी शिंगणे,रतन रेशवाल,नंदू राऊत,रंगनाथ पाटील, बी.एम. पठाण,शेख जुल्फेकार(स्वाभिमानी),सिद्दीक कुरेशी(मा.पं.स.सभापती),बळीराम शिंगणे,प्रकाश शेळके,कांता जोशी,संजय आंधळे, योगेश जोशी यांच्या सह गावातील गावकरी मंडळी ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
