शेंदूर्णी :-(प्रतिनिधी संतोष महाले )जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातली आहे. भारतात देखील कोरोना येऊन पोचला आहे. आणि महाराष्ट्रात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वा ढत चालली आहे. यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 22 /3/2020 रोजी आज जनता कर्फ्यू ची अंबलबजावणी केली आहे. जेणेकरून कोरोनाला आळा घालता यावा यासाठी जनता कर्फ्यू पाडण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येते देखील सर्व लोक डॉन करण्यात आले असून आवश्यक सेवासुविधा सुरू आहे आणि त्याचे पालन देखील शेंदुर्णी चे रहिवासी करत आहे कोरोनाची जनजागृती व्हावी म्हणून शेंदुर्णीत बॅनर देखील छापण्यात आले आहे शेंदुर्णी येथील रहिवासी पंडित जोहरे यांनी तिथल्या नागरिकांना सांगितले की कोरोनाला घाबरण्याचे काम नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपले हात वारंवार धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा अशा प्रकारचे सूचनांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्या
शेंदूर्णी मध्ये जनता कर्फ्यू चे अमलबजावणी
