पाचोरा (कुंदन बेलदार) – करोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा परिसरातील उद्यापासून (दि.२१) पाचोरा आठवडे बाजार भरणार नसल्याचे सांगितले आहे. शनिवारी आठवडे बाजार भरतो बाजार करण्या करीता पाचोरा पंचक्रोशीतील असंख्य नागरिक आठवडे बाजारात येतात . जागतीक संकट म्हणजेच कोवीड १९ कोरोना व्हायरस चा प्रमाण वाढु नये या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषद अधिकारी.पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी २२/०३/२०२०आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला असे पत्रक जाहीर केले.पाचोरा नगरपरिषद आणी.
पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी कोरोना पासुन सतर्क सावधान राहण्या करीता नागरीकांना सुचना दिल्यात.. ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.
प्रत्येकजण ‘करोना’च्या धास्तीने काम आटोपल्यानंतर घरात राहणे पसंत करीत आहेत. गावातील मुख्य चौक, हॉटेल्स, मंदिर आणि वर्दळीच्या या मुख्य ठिकाणांवर लोक येणे टाळत असल्याने परिसरात शांतता पसरलेली जाणवते आहे.ऊसतोड कामगार, नोकरदार, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची गैरसोय होणार असून पाचोरा येथील शनिवारी आठवडे बाजार न भरल्यास आर्थिक उलाढालीवर थेट परिणाम होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा परिसरातील बाजार आज बंद
