कजगाव :-(संजय महाजन) संपूर्ण जगात आहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत सर्वं जगात कोरोना आजाराने धुमाकूळ घातलेला आहे भारतात ही अनेक रुग्ण आढळून आले आहेत केंद्रसरकार व राज्यसरकार आवश्यक त्या सर्व उपाय योजना करीत आहेत आरोग्य विभागासह सर्वच विभाग दैनंदित घटनेवर लक्ष ठेवून आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु च्या केलेल्या आवाहनाला उत्सुर्फपणे प्रतिसाद देऊन कजगाव बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली आहे शनिवार व रविवार संपूर्ण दिवसभर सर्वत्र कडकळीत बंद पाडण्यात येणार आहे शनिवार पासूनच कजगाव बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र कजगाव बाजापेठेत शांतता पसरली आहे संपूर्ण गावात कोरोना व्हायरस बाबतीत ग्रामपंचायत च्या वतीने गावात गाडी फिरवून जनजागृती करण्यात येत आहे व आवश्यक त्या सर्व सूचनांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे कजगाव बंद च्या परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील लक्ष ठेवून आहेत त्यांना ग्रामपंचायती चे क्लर्क सुनील पवार रघुनाथ महाजन रवींद्र मालचे संजय पाटील जाकीर मणियार व इतर सर्व ग्रा प कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे
””’:रविवारचा आठवडे बाजार बंद
रविवारी भरणाऱ्या कजगाव आठवडे बाजार पूर्ण पणे बंद ठेवण्यात आला आहे परिसरातील भोरटेक पिंप्री खाजोळा नेरी वडगाव कनाशी बोदर्डे लोण बोरणार गोंडगाव बांबरुळ घुसर्डी पासर्डी तांदुळवाडी हिंगोने वडाळे मळगाव व परीसरातील अनेक खेड्यावरून लोक कजगाव बाजारात येतात त्यामुळे येथील बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी होते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतिने रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद केला आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे
कजगाव बाजारपेठ पूर्णपणे बंद रविवारचा आठवडे बाजारही राहणार बंद
