पाचोरा:-लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रशाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार दिपक वामन पवार यांची सर्व पालकवर्गाच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणून अशोक भगतसिंग परदेशी,सदस्य सचिन रत्नाकर कासार,योगेश संतोष तेली ,राजू रामदास भदाणे,डॉ.केयुर धनंजयराव चौधरी, रुपाली ईश्वर माळी, मनिषा नितीन कोळी,उषाबाई श्रीकृष्ण राजपूत,सरलाबाई दौलत खाटीक सचिव–मुख्याध्यापक शंकर गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी पालक सभेचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शंकर गायकवाड यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पवार व समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सभेला पालकवर्ग,भगिनी,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रतिक्रिया–लोहारा जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पालकवर्ग, ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.