रेतीमाफिया वेगवेगळी शक्कल लढवून रेतीचा अवैध धंदा दिवसाढवळ्या जोरात सुरू केला आहे.जळगाव शहरामध्ये रेतीची वाहतूक बंद असूनही त्यावरती उपाय म्हणून रेतीमाफिया वेगवेगळी शक्कल लढवून रेतीचा अवैध धंदा दिवसाढवळ्या जोरात सुरू केला आहे. याकडे जिल्हा महसूल विभागाचे प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रेती माफियांकडून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली जाते. काही वेळेस रात्री अवैधरितीने वाहतूक केली जाते, तर काही ठिकाणी प्रशासनातील कर्मचार्यांच्या आशीर्वादाने रेतीची अवैध वाहतूक केली जाते.त्यामुळे रेती माफिया कुठल्याही गोष्टी धजावत नाही व होणार्या परिणामांनासुद्धा घाबरत नाही.शहरात मुख्य रस्त्यावरून रेतीची अवैध वाहतूक सुरू असूनदेखील त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही कारण रेती माफियांनी आता चक्क नवीन शक्कल लढविली आहे.रेतीचे ट्रॅक्टर भरतांना खाली रेती भरली जाते ,तर वरून रेती दिसू नये म्हणून त्यावर खडीचा जाड थर लावला जातो. त्यामुळे ट्रॅक्टर जेव्हा मुख्य रस्त्यावरून जाते त्यावेळेस महसूल अधिकार्यांच्या देखील ते लक्षात येत नाही की,यामध्ये रेती आहे का खडी.
त्यामुळे असे म्हणता येईल की,दिवसाढवळ्या रेती माफियांकडून प्रशासनाच्या डोळ्यात खडी भरली जात आहे.याबाबत साईमत प्रतिनिधीने काल अजिंठा चौफुलीनजीक असलेल्या परिसरामध्ये असेच एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वरून खडी भरलेले ट्रॅक्टर जात जाताना दिसले तेंव्हा त्याची शहानिशा केली असता ज्या ठिकाणी ट्रॅक्टर खाली झाले त्याठिकाणी ट्रॉलीमध्ये वरून बांधकामासाठी लागणार्या खडीचा थर दिसला व त्याखाली चक्क नदीतील ओली रेती दिसून आली. या प्रकारास म्हणावे लागेल की, गोलमाल है भाई , गोलमाल है. याबाबत ट्रॅक्टर चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन सर्व ठिकाणी शहरात असेच प्रकार चालू आहे व आणि अधिकार्यांदेखील माहिती असल्याचे बोलून दाखविले.वाळूमाफियांच्या या शक्कलबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी त्यातून महसूल विभागाच्या भोंगळ कारभारही दिसत असल्याची चर्चा आहे.
रेतीमाफियाची वेगवेगळी शक्कल लढवून रेतीचा दिवसाढवळ्या चोरी
