कजगाव ता भडगाव येथून जळवळच असलेल्या घुसर्डी ता पाचोरा येथील शेतकरी बळवंत विठ्ठल महाले (वय५८)यांचा मृतदेह गावातील एका शेताच्या विहिरीत आढळला
बळवंत महाले यांचा मृतदेह विहीरीत तरंगतांना शेतात आलेल्या मजुरांनी व नातेवाईकांनी पहिला व घडलेल्या घटनेची वार्ता गावात व परीसरात वाऱ्यासारखी पसरली व गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली बळवंत महाले यांचा मृतदेह पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला व शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला मयताचे चुलत भाऊ सुशांत वाल्मिक पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहे यावेळी पोलीस नाईक नरेंद्र विसपुते पोलीस कोन्स्टेबल अमोल पाटील मनोहर पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
अत्यंत मनमिळावू व हसतमुख स्वभाव असलेल्या बळवंत पाटील यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
मयताच्या पश्यात पत्नी दोन मुले एक मुलगी आई वडील दोन भाऊ असा परीवार आहे
संजय महाजन, भडगाव
