देऊळगाव राजा : – आज रोजी महाराष्ट्र भर पाउसाने थैमान घातला आहे,यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याच पश्वभूमीवर देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणात 100% प्रमाणात पाणी भरणाझाला त्यामुळे धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले,
याच खडकपूर्णा नदीवर डीग्रस वस्तीजवळ कोल्हापूरी बांधारा बांधण्यात आला होता,
परन्तु बंधाऱ्यांचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने आज बांधलेल्या बंधाऱ्याची सपोर्ट भिंत ढासळल्याने बंधारा फुटला आहे.
व मोठया प्रमाणात पान्याच प्रवाह वाढत आहे.
यामुळे बंधाऱ्यां जवळील शेतकरी गीते रा.साठेगाव यांचे एक एक्कर मध्ये लावलेली कपाशी व एक्करच्या जवळपास पूर्ण शेत वाहून गेलेअसून त्याचे खोल नदीत रूपांतर झाले आहे.
माजी आमदार खेडेकर यांनी अंदाजे ६.५ कोटी रु चा खर्च लाऊन कोल्हापूरी बांधारा बांधला परन्तु काही महिन्यातच हा बांधारा फुटल्याने यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
सन २०१५-२०१८ च्या कार्यकाळात माजी आमदार यांनी हे काम पूर्णत्वास नेले, याबद्दल परिसरात त्यांचं कौतुक ही झालं परन्तु विधानसभा निवडणुकीत सदर बंधाऱ्यांचे काम निकृष्ट करण्यात आले आहे असे आरोप ही त्यांच्यावर करण्यात आले परन्तु तेच आरोप आज सत्य झाल्याचे दिसत आहे.
सदर बांधाऱ्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होऊन सिंचनासाठी तो उपयुक्त ठरला जरी असला मात्र, हे केलेले काम निकृष्ट झाल्याने बंधारा फुटला.
परिणामी, केलेला खर्च व साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांचे झालेले काम तंत्रशुद्ध व बांधकामाचे निकष न पाळता केल्यामुळे बंधारा फुटण्याचा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
आदील पठाण
