कजगाव ता भडगाव सह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कपाशी ज्वारी बाजरी कडधान्य व फळ बागायत पिकांचे चक्रीवादळ व जोरदार पावसाने नुकसान झालेले आहे हाता तोंडाशी आलेले पीक संपूर्ण वाया गेले आहे गुरांना चारा नाही मजुरांना हातात काम नाही व शेतकऱ्यांना या पावसामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली आहे डोक्यावर सहकार विविध बैंकांचे कर्ज शासकीय कर्जाचे डोंगर खाजगी सावकारांचा त्रास इत्यादी बाबी कठीण परिस्थिती असताना या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे तरी या खरिपाचे वाया गेलेले पिकांचे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामा करण्यात यावा व शासकीय अनुदान मिळावे तसेच सरसकट कर्ज शेतकऱ्याचे माफ करण्यात यावे या सर्व विषयांचा शासन स्तरावर विचार करून आम्हा बळीराजाना त्वरित न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता सैनिक शेतकरी बांधव यांच्यावतीने भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास महाजन शहराध्यक्ष भिकन महाजन महाजन शेतकरी कैलास जैन लक्ष्मण पाटील मानसिंग पाटील रितेश पाटील रामदास महाजन विजय पाटील रमेश सोनवणे प्रदीप महाजन ईश्वर पाटील समाधान चौधरी प्रवीण महाजन अशोक माळी संजीव सोनवणे पुंजाराम वाणी ज्ञानेश्वर मोरे गोरख महाजन डी के मोरे दीपक गायकवाड शेतकरी बांधव उपस्थित होते
“””;पिंप्री येथील शेतकऱ्यांनी दिले पाचोरा तहसीलदारांना निवेदन
परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कजगाव येथून जवळच असलेल्या पिंप्री ता पाचोरा येथील शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनाने करून शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे यावेळी तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले यावेळी रमेश पाटील प्रकाश पाटील नारायण पाटील गणेश पाटील अजय पाटील भावसिंग पाटील सुधीर पाटील राजेंद्र चव्हाण महेंद्र पाटील व अनेक शेतकरी उपस्थित होते
संजय महाजन, भडगाव
