जामनेर:-गोगडी नदीवरील विजय केशव घोंगडे यांच्या शेताजवळ असलेला सिमेंटचा साठवण बंधारा सतत धार पावसामुळे हा साठवण बंधारा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतातील उभी पिके सह माती वाहून गेली.शेतक-याचे आतोनात नुकसान, शेतकरी शासनाकडे नुकसान भरपाई साठी असून हा सिमेंटचा साठवण बंधारा सर पूर्ण ग्रामीण योजनेतून गेल्या दहा वर्षांपूर्वी हा सिमेंटचा साठवण बंधारा बांधण्यात आला होता यापूर्वी हा बंधारा फुटला असता तेथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने या केटीवेअर साठवण बंधाऱ्याची स्वखर्चाने दुरुस्ती केली आहे यावर्षी गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पावसाने सतत धार ठेवल्यामुळे गोगडी नदीवर पुराचे पाणी सतत येत असल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून हा सिमेंटचा साठवण बंधारा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेतीमालाचे खूप नुकसान झाले असून तरी हा साठवण बंधारा त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी माझी पंचायत समिती सभापती बाबुराव घोगडे सरपंच ज्योतीताई घोगडे डॉक्टर जितेंद्र घोगडे माधव द्राक्षे पुंडलिक द्राक्षे अनिल चौधरी सुधाकर राऊत माधव घोगडे यांच्यासह शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे