जामनेर- तालुक्यातील पळासखेडे जवळील पॉलिटेक्निक कॉलेज जवळ दोन मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी ०३ वाजता घडली. या अपघातात एक इसम घटनास्थळीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. गंभीर जखमीस जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पळासखेडे ते केकतनींभोरा दरम्यान खोल नाल्याजवळ जामनेर कडून केकनिंभोरा कडे येत असताना अशोक शिंगोटे ( वय 43 ) रा . केकटनिंभोरा व अज्ञात मोटरसायकलस्वार याच्यात समोरासमोर धडक झाली या धड़केत अशोक शिंगोटे यांचा जागीच मृत्यु झाला असून अज्ञात जखमीला पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे .
पळासखेड़े जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार
